गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ अंक क्र. १

युवानेता – मराठी साप्ताहिक

महाराष्ट्राचा विश्वासार्ह आवाज

ब्रेकिंग न्यूज
युवानेता – मराठी साप्ताहिक ५ नोव्हेंबर २०२६ | अंक क्र. १

पुणेकरांना दिलासा! आज ५ नोव्हेंबरची नियोजित पाणीकपात रद्द; नियमित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा निर्णय; नागरिकांना पाणीपुरवठा विभागाकडून महत्त्वाची सूचना

पुणे, दि. ५ (YUVA NETA) : पुणे शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. दिवाळीच्या निमित्ताने गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात येणारी नियोजित पाणीकपात पुणे महानगरपालिकेने रद्द केली आहे. त्यामुळे आज शहरातील पाणीपुरवठा नेहमीच्या वेळापत्रकानुसार करण्यात येणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयाने ४ नोव्हेंबर रोजी याबाबत अधिकृत प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे.

नियोजित पाणीकपात रद्द

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी होणारी नियोजित पाणीकपात रद्द करण्यात आली असून नागरिकांना नियमित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करण्यात येईल.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे नियोजित पाणीकपातीचा नागरिकांना सामना करावा लागणार नाही.

Arvind Bhongale

मुख्य संपादक

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल प्रसिद्ध केला जाणार नाही. प्रतिक्रिया संपादकीय मंजुरीनंतर दिसेल.